
२००८ मध्ये स्थापन झालेल्या परिवर्तन या सुशासनाचे ध्येय घेऊन जन्माला आलेल्या संस्थेचा तन्मय संस्थापक सदस्य आणि विश्वस्त आहे. परिवर्तनसह विविध सामाजिक संस्थांबरोबर तन्मय गेली १३ वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. शहरी शासनव्यवस्था याविषयी अभ्यास करण्यासाठी सुरू झालेल्या Policy Research Organization या थिंक टँकचा तन्मय संस्थापक अध्यक्ष आहे. पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून परिचित असणाऱ्या तन्मयने आजवर अनेक सामाजिक संस्था, विद्यार्थी गट आणि नागरी गट यांच्यासाठी माहिती अधिकार कायद्याच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाचा पुण्याचा प्रवक्ता आणि कोथरूड विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष म्हणून त्याने काम केले. त्यानंतर आप महाराष्ट्र राज्य मिडिया सेलचा सदस्य आणि प्रवक्ता म्हणूनही त्याने जबाबदारी पार पाडली.
महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, लोकप्रभा, साप्ताहिक विवेक, माहेर, मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच, किशोर अशा विविध दैनिकांत, साप्ताहिकांत आणि मासिकांमध्ये तन्मय सातत्याने सामाजिक राजकीय विषयांवर लिहितो. यासह ORF या ख्यातनाम अभ्यास गटासाठीही तन्मयने अनेकदा लिखाण केले आहे. लग्न आणि नातेसंबंध याविषयी 'लग्नकल्लोळ' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
माहेर, मेनका, प्रपंच अशा अनेक मासिकांसाठी त्याने कथालेखनही केले आहे. २०११ मध्ये तन्मयचा 'वर्तुळ' नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. २०२१ मध्ये प्लॅनेट मराठी या OTT Platform वर प्रसिद्ध 'हिंग पुस्तक तलवार' या विनोदी वेबसिरीजचा तन्मय सहलेखक आहे. सध्या एका कादंबरीवर काम सुरू असून, अजून एक वेबसिरीज आणि सिनेमा याचेही त्याचे लेखन चालू आहे.
No comments:
Post a Comment