बुरुज पडले, तट
खचले,
दार गंजले, किल्ले केविलवाणे.
दार गंजले, किल्ले केविलवाणे.
सुरुंग लावून तटाला
भगदाड पाडले,
कोण्या एका शत्रूने.
फुटक्या विटा, तुटके लाकूड विकले
खुद्द किल्लेदाराने.
कोण्या एका शत्रूने.
फुटक्या विटा, तुटके लाकूड विकले
खुद्द किल्लेदाराने.
शत्रू कधी आला, कधी
गेला
कळेना झाले.
शत्रू कोण, मित्र कोण
हेही कळेना झाले.
कळेना झाले.
शत्रू कोण, मित्र कोण
हेही कळेना झाले.
खिंडार बुजवण्या
टेंडर निघाले,
प्रक्रियेत या झाले सारे हात ओले.
भंपक माल सगळा, काळजी पुरी घेतली
पुढल्या वेळी,
नुसत्या धक्क्यानेच तट कोसळे खाली.
प्रक्रियेत या झाले सारे हात ओले.
भंपक माल सगळा, काळजी पुरी घेतली
पुढल्या वेळी,
नुसत्या धक्क्यानेच तट कोसळे खाली.
मग पुन्हा टेंडर,
पुन्हा हात ओले, पुन्हा भंपक माल.
आजही सगळे सगळे अगदी तसेच, जसे झाले होते काल.
आजही सगळे सगळे अगदी तसेच, जसे झाले होते काल.
बुरुज पडले, तट
खचले,
दार गंजले, किल्ले केविलवाणे.
दार गंजले, किल्ले केविलवाणे.
केविलवाण्या
किल्ल्याची किल्लेदारी पाहिजे
म्हणून मारकाट चालू आहे.
ढासळला किल्ला तरी अद्याप भरपूर काही बाकी आहे
म्हणून मारकाट चालू आहे.
म्हणून मारकाट चालू आहे.
ढासळला किल्ला तरी अद्याप भरपूर काही बाकी आहे
म्हणून मारकाट चालू आहे.
गदारोळात
किल्ल्यावरल्या राहावे कसे?
शहाणे सगळे गेले किल्ला सोडून.
उरल्या वेड्यांच्या भयभीत नजरा
बघती युद्ध हे दाराआडून.
शहाणे सगळे गेले किल्ला सोडून.
उरल्या वेड्यांच्या भयभीत नजरा
बघती युद्ध हे दाराआडून.
बघतो मी उदासपणे.
निःश्वास सोडतो हताशपणे.
निःश्वास सोडतो हताशपणे.
वाटते, किती दिवस
चालणार आहे हे?
अजूनही लोक कसे सहन करतात हे?
अजूनही लोक कसे सहन करतात हे?
तेवढ्यात दिसतात
कोणी-
एकेक वीट चढवत तट मजबूत करणारे.
गंज चढल्या दरवाज्याला तेलपाणी करणारे.
एकेक वीट चढवत तट मजबूत करणारे.
गंज चढल्या दरवाज्याला तेलपाणी करणारे.
पाहून हे दृश्य,
बुरुज माझ्या मनाचे बुलंद उभे राहतात,
दरवाजे निष्ठेचे भक्कम दिसू लागतात.
झेंडा कर्तव्याचा वाऱ्यावर फडकू लागतो,
उभारी येत मनाला, मी पुन्हा स्वप्ने पाहू लागतो.
बुरुज माझ्या मनाचे बुलंद उभे राहतात,
दरवाजे निष्ठेचे भक्कम दिसू लागतात.
झेंडा कर्तव्याचा वाऱ्यावर फडकू लागतो,
उभारी येत मनाला, मी पुन्हा स्वप्ने पाहू लागतो.
स्वप्ने भक्कम किल्ल्याची, दुश्मनांना धडा शिकवण्याची.
स्वप्ने रयतेच्या भल्याची, स्वप्ने सुख अन् समृद्धीची.
Dhanywad - We Shri ShivaDurga Samvardhan works on fort conservation from 2007 and currently working on Rohida, Rajgad, TIkona, Bahadduragad, Antur forts.
ReplyDeletePlease visit our FB profile https://www.facebook.com/groups/177555482257472/
Regards,
Yogesh Ratnakar Phatak.
+919823300724
www.shivdurg.org
Nice..
Delete