Thursday, January 20, 2011

नष्ट होण्यात मजा आहे...!

र्मग्रंथात सांगितलं आहे की एक हजार वर्षांनी जग नष्ट होणार. युरोपातल्या सगळ्या लोकांमध्ये भीती पसरली. ९९५...९९६...९९७...९९८... असे करता करता एक दिवस इसवी सन ९९९ उजाडले. शेवटचे वर्ष... देवाचीच इच्छा.. या वर्षानंतर सगळं संपणार म्हणून श्रीमंतांनी गरिबांना पैसे वाटायला सुरुवात केली. अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्या सगळ्या लोकांनी गोदामातील दडवून ठेवलेले अन्न भुकेल्या लोकांमध्ये वाटून टाकले. अनेक वर्षांपासूनचे शत्रू, मरताना कटुता संपवूयात असं म्हणत एकमेकांचे मित्र बनले. सगळे लोक जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करू लागले, मरताना गाठीशी पुण्य असावे म्हणून परोपकार करू लागले. सात आठ पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती असलेले लोक पुढच्या पिढ्यांचा विचार सोडून देऊन सर्व संपत्ती वाटून टाकू लागले. मरण्यापूर्वी हे जग एकदा तरी पहिलेच पाहिजे अशा भावनेने असंख्य लोक जग पहायला निघाले...सफरींवर  निघाले! असंख्य लोक धर्मातील पंथा पंथातील भेद मिटवून सलोख्याने राहू लागले. देशांमधील युद्धे थांबली. जसजसा विश्वाच्या अंताचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे लोक आपापल्या इच्छा पूर्ण करून चर्च मध्ये जमा झाले. २५ डिसेंबर..ख्रिसमस.. सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. असंख्य नाटके, लग्न, गाण्याचे कार्यक्रम, सामुहिक नृत्य...जल्लोषात लोक आपले मरणाचे भय आणि दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होते. अखेर इ.स. ९९९ चा ३१ डिसेंबर संपला... १ जानेवारी उजाडला... काहीच घडले नाही. मग २...३...४... करता करता ३१ जानेवारी उजाडला. हळूहळू पाहता पाहता इ.स. १००० चे बाराही महिने संपले...इ.स. १०००...१००१...१००२... ही पण वर्षे भुर्रकन उडून गेली. काहीच घडले नाही. आता जगाचा अंत होणार नाही.. लोकांना कळून चुकले. श्रीमंतांनी गरिबांना वाटलेले पैसे परत मागायला सुरुवात केली. गरिबांनी ते द्यायला नकार दिला. मग भांडणे सुरु झाली. पुन्हा एकदा भुकेले लोक रस्त्यांमधून फिरू लागले.. मित्रांमध्ये वितुष्ट आले...पुढच्या पिढ्यांसाठी द्रव्य साठवायला सुरुवात झाली. देशांमध्ये युद्धांना तोंड लागले. पंथा पंथातले वाद पुन्हा सुरु झाले. नास्तिक लोक सगळ्या आस्तिक लोकांना नावे ठेऊ लागले. चोऱ्या दरोड्यांना ऊत आला. धर्माचे प्रमुख असलेल्यांनी धर्माची म्हणजेच पर्यायाने स्वतःची सत्ता अबाधित राहावी म्हणून नवनवीन नियम तयार केले. एकूणच जग आधी होते तसलेच झाले... मधला वर्षभराचा काळ हा स्वप्नवत वाटू लागला.

----------------------------------------------------------------------------------------

जगातल्या काही मोठ्या संस्कृतींची गोष्ट...

इजिप्शियन संस्कृती...प्रचंड मंदिरे, ग्रेट पिरामिड आणि ममी बनवून मृतदेह जपून ठेवणारी संस्कृती. सुमारे दोन तीन हजार वर्षांपूर्वी या त्या आधी किमान एक हजार वर्ष अस्तित्वात असलेल्या जुन्या संस्कृतीचा नाश झाला. अत्यंत हुशार, प्रगल्भ अशी संस्कृती एकाएकी नष्ट झाली. का नष्ट झाली, कशामुळे नष्ट झाली याबाबत कसलाही खुलासा इतिहास करू शकत नाही. इ.स.पूर्व ३०० च्या आसपास अलेक्झांडर जेव्हा इजिप्त मध्ये गेला तेव्हा त्याला तिथली सगळी संकृती मोडकळीला आलेली दिसली. आणि अडाणी लोक तिथे राज्य करताना आढळले. 

मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती... त्या काळी स्थापत्यशास्त्रामध्ये आशियातील सर्वोत्तम नगरे सिंधू नदीपासून ते अफगणिस्तानातील अमुदर्या नदीपर्यंत पसरली होती. इथल्या नगर रचनेकडे पाहून आधुनिक काळातही चकित व्हावे! ख्रिस्तपूर्व ३००० पासून ख्रि.पू. १६०० पर्यंत या संस्कृतीची भरभराट झाली. त्यानंतर अचानक इथे राहणाऱ्या लोकांनी भांडी कुंडी वगैरे सगळे काही सोडून ही नगरे सोडून दिली. हडप्पा संस्कृती नष्ट झाली. इथे राहणारे लोक इथून निघून का गेले, कुठे गेले...इतिहासाला काहीच माहित नाही. त्याच लोकांचे वंशज म्हणवणारे गंगेच्या खोऱ्यात पसरलेले लोक मात्र त्यांच्या इतके प्रगल्भ नव्हते. हडप्पा संस्कृती का नष्ट झाली? 

माया संस्कृती... दक्षिण अमेरिकेत प्रचंड मोठी बांधकामे, थडगी, अप्रतिम मंदिरे बांधणारी ही संस्कृती. हजारो लोक राहू शकतील अशी अप्रतिम नगरे आणि आजही आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावेल असे खगोलशास्त्रातले ज्ञान ही या माया संस्कृतीची खासियत. इ.स. १००० पर्यंत हे सगळे टिकून होते. पुढे एका एकी ही संस्कृती नष्ट झाली. या नगरांमध्ये राहणारे लोक सगळे काही तसेच सोडून निघून गेले. पुढे पाचशे वर्षांनी जेव्हा युरोपीय वसाहतवादी तिथे आले तेव्हा त्यांना या प्रचंड नगरांमध्ये राहणारे अडाणी आदिवासी सापडले. माया संस्कृती कशी नष्ट झाली, ते सगळे लोक कुठे गेले, नेमके काय झाले याबाबत कोणालाच काही माहित नाही. 

इतक्या प्रगल्भ, हुशार आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या या संस्कृती का नष्ट झाल्या? त्यांनी आपले ज्ञान पुढच्या पिढ्यांना का दिले नाही? नैसर्गिक वृत्तीच्या विरोधात जाऊन त्या संस्कृतीन्मधले लोक असे का वागले?? त्यांना आपला वंश जिवंत ठेवायचा नव्हता का? त्यांना माणूस प्राणी जगावा असे वाटले नाही का? नेमके काय झाले? अशा नष्ट झालेल्या अजून किती संस्कृती, नगरे जमिनीखाली आहेत माहीतच नाही...

--------------------------------------------------------------------------------------

"Desire is the root cause of all evil"- Gautam Buddha

प्रजनन करणे, पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करून ठेवणे, पुढे अनेक वर्ष आपले नाव या पृथ्वीवर कायम स्वरूपी रहावे, माणूस प्राणी या जगात जिवंत ठेवावा या एका विलक्षण नैसर्गिक इच्छेपोटी माणसामाणसातील हेवेदावे वाद वाढीस लागतात. देशांमध्ये युद्ध होतात. एका गटाकडून दुसऱ्याचे शोषण होते. आणि जग कितीही बदलले तरी साधारण स्वरूप तेच राहते. रोमन साम्राज्यवाद होता.. त्यानंतर युरोपीय लोकांनी वसाहतवादातून साम्राज्यवाद सुरु केला. मग रशिया अमेरिकेचा जगवारच्या वर्चस्वाचा वाद सुरु झाला. आणि आज ची अमेरिका वर्चस्व गाजवण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. धर्मावरून युद्ध पूर्वीही होत असत, आता तशा युद्धाचा गंभीर धोका जगातल्या प्रत्येक देशाला आहे. अणूयुद्धामुळे जग नष्ट होण्याचा धोका सतत मानवाच्या डोक्यावर आहे. अल कायदाच्या हाती अण्वस्त्रे, इराणकडे संहारक अस्त्रे, भारताचा अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर सही करण्यास नकार, चीनची अणुचाचणी, ग्लोबल वॉर्मिंग, समुद्राची पातळी वाढणार, मुंबई समुद्रात जाणार, २०१२ मध्ये जगबुडी होणार अशा बातम्या आल्या की जगातल्या शेकडो देशांच्या प्रमुखांची झोप उडते. मग त्या देशातल्या प्रसारमाध्यमांची...आणि मग त्या त्या देशातल्या लोकांची... 
काय आहे हे? नष्ट होण्याची भीती? 
मानव वंश जिवंत ठेवण्याचा आणि पुढच्या पिढ्यांना काहीतरी चांगले (जे स्वतःला चांगले वाटते ते) देण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आपला वंश टिकवणे त्याला महत्वाचे वाटते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलगा होणे चांगले मानले जात असे ते यामुळे (वंशाचा दिवा वगैरे...!) आपल्या मुलांसाठी गडगंज संपत्ती साठवून ठेवावी, आपले नाव इतिहासात अजरामर व्हावे, पुढच्या पिढ्यांनी आपले नाव लक्षात ठेवावे अश काही इच्छा माणसाच्या मनात घर करून राहतात. आज मी जर अमुक गोष्ट केली तर माझ्या पुढच्या पिढ्या सुखाने राहतील हे विचार वाढले. 
एका विशिष्ट वेळी, एका विशिष्ट क्षणी एका पूर्ण संस्कृतीने, मानव समूहाने भले मग तो कितीक प्रगल्भ असेना पुढच्या पिढ्यांचा विचार सोडला तर? पुढच्या पिढ्यांचा विचार, म्हणजे पुढच्या पिढीच्या निर्मितीचाही विचार, सोडून दिला तर? तो मानव समूह/ ती संस्कृती नष्ट होऊन जाईल. पण आपण केव्हा नष्ट होणार हे नेमके त्या लोकांना माहित असेल. म्हणजे उद्या समजा एका मनुष्य समूहाने ठरवले की यापुढे एकही मूल जन्माला येणार नाही. काल जन्माला आलेले शेवटचे मूल. याचाच अर्थ त्या समूहाला माहित असेल की तो पुढच्या जास्तीत जास्त शंभर वर्षाच्या कालावधीत संपुष्टात येणार आहे. ही शेवटची शंभर वर्षे ते लोक आनंदात घालवतील की दुःखात? म्हणूनच मी सुरुवातीला एक हजार वर्षांपूर्वी काय झालं ते सांगितलं. जग नष्ट होणार असं कळल्याबरोबर सगळे लोक आनंदात जगू लागले. पुढच्या पिढीसाठी काही ठेवायचेच नाही...कारण पुढची पिढीच नसणार आहे...! 
विचार करा, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ची भीती सोडून सर्व लोक बिनधास्त ए.सी. लावत आहेत. जगातले पेट्रोल अजून २०० वर्षात संपणार आहे, म्हणून जपून वापरायची गरज नाही. मी आज ५०० कोटी जमवून उपयोग नाही, कारण ते खर्चच करता येणार नाही... असे काही घडले तर? पृथ्वीवरची माणसाची निदान शेवटची पिढी तरी आनंदात जगेल, समाधानाने जगेल...!!! एक न एक दिवस नष्ट तर व्हायचेच आहे...अणू युद्धात किंवा असह्य तापमान वाढून नष्ट होण्यापेक्षा... समाधानाने आनंदात नष्ट होण्यात मजा आहे...! 

जगातील सर्व मोठ्या संस्कृती अशाच नष्ट झाल्या असतील?? 

13 comments:

  1. लेख मस्त आहे. विषय आवडला. आणि त्याला दिलेली संस्कृतींची background विशेष आहे. नष्ट होणं किंवा in other words, मृत्यू ही एक गोष्ट अशी आहे ज्या द्वारा निसर्ग आपला control दाखवून देतो! पण किती काहीही झालं, तरी संस्कृती किंवा सगळं जगच नष्ट होण्याची कल्पना kahi सुखावह नाहीये!!

    ReplyDelete
  2. Facts to Fiction to fantasy!!! Masstaa! Mala mandani khup aavadli pan as swapnil says kalpana kharach sukhavah naie!!

    mhanje thodkyat mala asa watata ki let nature and life take its own course, we need not take any measures for it nor can we hope to predict it !!

    ReplyDelete
  3. @ Amruta...
    I guess you didn't interpret it in the correct sense...I'm not saying that nature should dominate human being at take its own course...No, I'm saying that at a saturation point, we should think beyond conventional, "natural" scope. I'm talking about going beyond Nature's rule of reproduction. I'm talking about living to the fullest..!
    the second part is not a fiction...u can call it a mystery...so it becomes facts to mystery to fantasy...!

    ReplyDelete
    Replies
    1. Don't you think that we are missing one fundamental understanding and that is Human is also a part of nature and bound by the rules of nature. Whatever he does or doesn't is also a part of nature and is very natural.

      Delete
  4. @ Swapnil and Amruta
    सगळं जग नष्ट होण्याची कल्पना करत जगायचंच कशाला?? माझ्या मते भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हीशी आपण संबंध तोडून टाकावेत... भूतकाळात एक मनुष्य शिवाजीचा गुरु होता की व्यवस्थापक याच्याशी जसे मला काही देणे घेणे नसावे, तसे भविष्यातल्या शिवाजीचा गुरु कोण असेल हेही माझ्या दृष्टीने विचार करण्यासाठी आवश्यक नाही. अशा काहीशा संपूर्ण काल्पनिक आणि स्वप्नवत वर्तमानाबद्दल मी बोलतो आहे.
    सगळं जग आपल्या नंतर नष्ट होईल हा विचार न पटणं, त्याहीपेक्षा न आवडणे साहजिक आहे. कारण असा विचार हजारो वर्षात आपण केलाच नाही कधी... भविष्यातल्या पृथ्वीवर कसं असेल सगळं, माणूस संपल्यानंतर इथल्या प्रचंड नगरांचे काय होईल, निसर्ग पुन्हा आधीसारखा होईल का, ग्लोबल वॉर्मिंग थांबेल का, असले सगळे प्रश्न भविष्यकाळाशी निगडीत आहेत. आणि जोपर्यंत भविष्य आणि भूत आपण सोडून देत नाही तोपर्यंत माणसाला मृत्यू आधीचे सर्वोच्च सुख कधीच प्राप्त होणार नाही. ते सर्वोच्च सुख काय आहे मला माहित नाही...पण ते सर्वोच्च असेल असा माझा दावा आहे. "मी नसेन तेव्हा या अनंतात कुठेच नसेन" या विचारांवर ते सुख/ समाधान आधारलेले असेल.
    सामान्यतः अगदी नैसर्गिकपणे माणसाला कायम "मर्यादा" आवडतात. एका दीड कोटी स्क्वेअर फुटाच्या हॉल मध्ये तुम्हाला झोपायला आवडेल की १० बाय १५ च्या छोट्या खोलीत? छोट्या खोलीच्या भिंती म्हणजे या माणसाला आवडणाऱ्या मर्यादा आहेत. तसंच काहीसं मनुष्य प्राण्याबद्दल तुम्हाला वाटत नाही का?? गेली काही लाख वर्षे हा प्राणी या पृथ्वीवर जगतोय. 'आता पुरे' असे वाटत नाही का? डायनासोर येऊन गेले, असंख्य प्राणी पक्षी नष्ट झाले... माणसाची वाटचाल अनंत चालूच आहे हे खटकत नाही का??!!

    ReplyDelete
  5. @Tanmay - we are not there yet.... There are so many interesting things to do...

    We are not there yet!

    ReplyDelete
  6. There will always be some interesting things to do... you can think, imagine, pursue infinite things. I'm talking about limiting... limiting yourself to 'present'...
    we always think about 'future' based on 'past'..and eventually we end up with spoiling present...
    "There are so many interesting things to do..."
    do it by yourself, do not pass on the burden of responsibilities on the next generation. It sounds spiritual, but you must decide where to go,what to do in 'your' life. You have no right to decide anything for future generations.

    ReplyDelete
  7. i just loved your concept of limiting yourself to present! जर सर्व नष्ट व्हायचंच असेल तर त्याची वाट बघत आयुष्य अर्धवट आणि चिंतेत जगण्या पेक्षा एक विशिष्ट वेळ ठरवून तो पर्यंत 'संपूर्ण' जगण्यात खरच जास्त खूपच जास्त सुख असेल.waiting for something is a phase that nobody likes.जसं सगळं नष्ट होण्याची कल्पना सुखावह नाहीये तशीच किंवा त्याहूनही अधिक, सगळ नष्ट होण्याची वाट बघण ही कल्पना पण सुखावह नाहीये.आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची वेळ निश्चित होते तेव्हा आपण तिची वाट बघणं सोडून मध्ये असलेला वेळ 'जगण्यात', आपल्या आवडत्या गोष्टी करण्यात घालवतो! म्हणजे आत्ताची वेळ हे 'खरं' वर्तमान असतं आणि वाट बघणं हे भविष्य. पण जेव्हा वाट बघण्याचा कालावधी अनिश्चित न राहता निश्चित होतो तेव्हा आत्ताची वेळ आणि ती निश्चित वेळ या मधला कालावधी आपल्या साठी 'वर्तमान' होतो आणि साहजिकच त्या मुळे त्यात संपूर्ण जगून घेणं जास्त शक्य आणि सोप्पं आहे! ही कल्पना जरी खूप out of the box असली आणि शक्य आहे का नाही, आणि असली तरी असा करणं योग्य का अयोग्य यावर खूप वादविवाद होण्या सारखी असली तरी चिंतेत नष्ट होण्या पेक्षा सुखाने नष्ट होण्यात खरंच मजा आहे!!

    ReplyDelete
  8. @ Tanmay: Ya i guess i interpreted it wrongly! Zara kaccha a re azun marathi!:P
    If thats what u are thinking maybe u are right... So its all here and now!
    However, Does that do away with our ambitions and dreams? Not criticizing, Just a a doubt...
    @Ankita: Beautifully put it in crisp and clear words i must say!:)

    ReplyDelete
  9. who is telling u to not dream? or not to be ambitious? But how can u be ambitious for your next generation? I can have the ambition of becoming famous cricket player...and I'll try to pursue my dreams and ambitions... But when I start thinking that my son will also be a cricket player, problems arise....

    ReplyDelete
  10. खूप छान लिहिला आहेस. I read it just cause the title itself was so interesting!
    Totally agree on the point that, we have no right to decide anything about the future generations.

    जरी title interesting असला, तरी ते थोडा negative वाटता. हे, "असच नष्ट होण" मलाही कुठेतरी खटकतंय! सगळा संपणार आता, म्हणून आनंदात जगणं काहीसा नाही पटते. It is a depressing thought, just try and really think about it. As you said, "सगळं जग नष्ट होण्याची कल्पना करत जगायचंच कशाला?? भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हीशी आपण संबंध तोडून टाकावेत...". मलाही हेच म्हणायचं, सगळा नष्ट होण्याची कल्पना करण्यापेक्षा, फक्त एवढा मनात ठेवला कि, 'मी एक माणूस आहे आणि मी आता कोणत्याही क्षणी मरू शकतो!' मग झालं ! The randomness and the uncertainty of the "कोणत्याही क्षणी" word, should take care of the rest then. Cause, past is gone, future could be death...all we are left with is present!

    So, I do believe in the though of living in the present, "carpe diem", seizing the day. makes sense!
    A beautiful quote by Thoreau, “I went to the woods because I wanted to live deliberately, I wanted to live deep and suck out all the marrow of life, To put to rout all that was not life and not when I had come to die Discover that I had not lived.”

    Thanks for sharing such a thoughtful topic!

    ReplyDelete
  11. tanmay, mi tuze he rup pahun thakk zalo aahe. tan, tuze salaam !

    ReplyDelete
  12. या सगळ्या संस्कृती का नष्ट झाल्या असतील? आणि जग नष्ट होणार आहे म्हणुन बेफिकीरपने वागायच? का यातून काही बोध घ्यायचा??

    ReplyDelete