Friday, December 17, 2010

खरेखुरे स्वातंत्र्य...

आजूबाजूला पाहिलं की मला नेहमी जाणवतं की,  आपण सगळेच.... तुम्ही, मी, आपले नातेवाईक, मित्र, ओळखीचे आणि अनोळखी लोकही...सगळेच गुलाम आहोत. ही गुलामी आपणच आपल्यावर लादून घेतली आहे... स्वखुशीने...!!! पिढ्यान पिढ्या अशा प्रकारची गुलामगिरी करायची सवयच जडली आहे आपल्याला. ब्रिटीश लोकांपासून भारत स्वतंत्र होणे, गोऱ्या लोकांच्या वर्चस्वातून काळे स्वतंत्र होणे, तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या जाचातून अस्पृश्य समाज स्वतंत्र होणे, सरकारी बंधनातून आर्थिक व्यवस्था मुक्त होणे इ.इ.सर्व स्वातंत्र्याच्या गोष्टी आपण वाचतो, पाहतो, अनुभवतो. यासगळ्याहून भयंकर अशा गुलामगिरीत आपण आहोत हे वास्तव आपण पार विसरून गेलो आहोत...

"भाऊ, राजसाहेबांनी सांगितलंय... तस्सच करणार आपण..", नाक्यावरचा पक्या.
"अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला बलिष्ठ करायचं स्वप्न ठेवलंय आपल्यासमोर. त्यानुसार मी काम करतो.", सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता वैभव.
"ऑर्डर आली की गोळी चालवायची हे माझं काम", सुभेदार सिंग.
"मी सांगतोय तसच वागायचं, यावर एक शब्दही चर्चा नकोय.", श्रीयुत कुलकर्णी आपल्या १८ वर्षीय मुलाला उद्देशून.
"त्या मुलीला भेटायचं नाही म्हणजे नाही.", प्रेयसी आपल्या प्रियकराला.
"आमच्या गुरूंनी सांगितलं आहे असं करायचं.", शास्त्रीय नृत्यशिक्षण घेणारी एक मुलगी.
" पिंडाला कावळा शिवला पाहिजे", भटजीबुवा ओंकारेश्वराच्या घाटावर.
"मुसलमानांना मारला पाहिजे.", एक हिंदू.

वरची सगळी वाक्ये बारकाईने वाचा.. काय दिसतंय? मला तर या सगळ्यातून गुलामगिरी दिसत आहे... शुद्ध गुलामगिरी...वैचारिक गुलामगिरी...
आपण विचार करायचे विसरलो आहोत का??? आपला मेंढ्यांचा कळप का झाला आहे??? आपण कोणाचे तरी गुलाम होण्यासाठी एवढे आसुसलेलो का आहोत?? कायम आपल्याला राजसाहेब, कलाम किंवा गुरु का हवा आहे?


 "अनुयायित्व" या बंधनात आपण सगळे अडकून पडलो आहोत. अनुयायी होणं म्हणजे काय? गुलामगिरी पत्करणं... समर्पित होऊन जाणं...स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट करणं, स्वतः विचार करण्याचा नाकारणं... यामध्ये माणूस स्वतःची सुटका करून घेतो. मानवी मनाला जबाबदारी नको असते. एखादी गोष्ट समोरचा सांगतोय म्हणून करण्याने जबाबदारी कमी होते. गांधी म्हणले की स्वदेशी वापरा म्हणून मी खादी वापरणार, सावरकर म्हणले धर्माला वाचवा की चालले धर्माला वाचवायला, स्वतःहून विचार करण्याचे टाळणे हा अनुयायीत्वाचा सगळ्यात मोठा दोष आहे. अनुयायीत्वामुळे कट्टरता येते, उच्च-नीचता येते, योग्य-अयोग्यता येते. अमुक अमुक विचारसरणी योग्य आहे म्हणून सर्वांनी तीच अनुसरली पाहिजे असा आंधळा आग्रह वाढीस लागतो. माणसाला जबाबदारी टाळण्यासमोर स्वतःच्या स्वातंत्र्याचीही फिकीर राहत नाही. आणि आता तर शेकडो वर्षांच्या या पारतंत्र्यामुळे आपण पारतंत्र्यात आहोत ही जाणीवच माणूस विसरून गेला आहे. त्यामुळे माणसाला खरोखरीचा विकास साधायचा असेल तर आधी स्वतंत्र व्हावे लागेल. स्वतंत्र याचा अर्थ समाजात न राहणे असा नव्हे. उलट या वैचारिक स्वातंत्र्याने समाज अधिक प्रगल्भ व्हायला मदत होईल.

दंगलींच्या वेळी माझे आयुष्यात काहीच बिघडवले नाही अशा व्यक्तीला मी केवळ आणि केवळ वैचारिक पारतंत्र्यामुळे ठार करायलाही तयार होतो. माझ्या नेत्याविरोधात कोणी मतप्रदर्शन केले तर त्या माणसाचे डोके फोडायला मी मागे पुढे बघत नाही. माझ्या गुरूंची कोणतीही कृती मला वंदनीयच वाटते. माझ्या अध्यात्मिक गुरूने सांगितले तस्सेच मी वागायचा प्रयत्न करतो. मग ते किती का मूर्खपणाचे असेना.

जसे एखाद्या व्यक्तीचे अनुयायित्व असते तसेच ते देशाचेही असते. पाश्चिमात्य देशांचे अनुयायित्व आपल्या समाजातील काही घटकांनी घेतले आहे. पण त्याचवेळी सनातन धर्माचे अनुयायित्व घेतलेले लोक त्या घटकांना विरोध करतात. एकूणच या विरोधांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांना विरोध करतात. अनुयायीत्वामुळे दुसऱ्याला आदर देण्याची प्रवृत्ती कमी होते. माणसाला 'माणूस' म्हणून आदर द्यायला आपण केव्हा शिकणार आहोत???

या दोषांमुळेच कोणाचाही आणि कसलाही अनुयायी होणं मला साफ नामंजूर आहे. चाहता आणि अनुयायी यामध्ये फरक आहे. मी अनेकांचा चाहता आहे. अनेकांमाधल्या अनेक विविध गुणांचा चाहता आहे. पण अनुयायी? मुळीच नाही. त्यामुळेच मी एकाच वेळी गांधींचा आणि सावरकरांचा चाहता असू शकतो. एकाच वेळी हिटलर आणि विन्स्टन चर्चिलचा चाहता असू शकतो. पण अनुयायी? त्यांच्यात कट्टरता असते. गांधींच्या अनुयायांना सावरकरांचं नाव काढलं तरी तिडीक येते. आणि गांधींचा विषय निघाल्यावर सावरकरवादी कडवटपणे बोलतात.

माणसाला माणूस म्हणून आदर देण्यासाठी प्रत्येकातील दोषांचाही आदर केला गेला पाहिजे. तरच तो खराखुरा आदर ठरू शकेल. एखादी व्यक्ती शंभर टक्के योग्य आणि अगदी परफेक्ट असूच शकत नाही. मग ते गांधी असोत सावरकर असोत किंवा हिटलर असो.
मी ज्या व्यक्तीचा अनुयायी आहे ती व्यक्ती चूक करूच शकणार नाही किंवा मी ज्या धर्माचा आहे त्यामध्ये काही चूक असूच शकत नाही, या भावनेतून केवळ आणि केवळ वैचारिक पारतंत्र्यच दिसून येतं.

संतांनी कायम सांगितलं की देव नाही देव्हाऱ्यात, देव माणसात पहा. याचा अर्थ काय? एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून समोरच्या व्यक्तीला महत्व द्या, आदर द्या. धर्माच्या नावे कर्मकांड करत बसू नका. त्यावर त्यांच्या अनुयायांनी काय केलं? त्यांनी संतांना देवत्व बहाल केलं. आणि त्यांना देव म्हणल्यावर ते म्हणतील ते सगळं सत्य. मग एखादा आनंद यादव जेव्हा तुकारामांचं "माणूस"पण आपल्या कादंबरीतून दाखवायचा प्रयत्न करतो तेव्हा तुकारामांना देव मानणारे हजारो अनुयायी आनंद यादवांना बिनशर्त माफी मागायला लावतात. इतकेच नव्हे तर पुस्तकावर बंदीही येते. अगदी असंच घडतं शिवाजी महाराजांबाबत, आणि ज्याला अनुयायी आहेत अशा प्रत्येकाबाबत...


अनुयायित्व आपल्याला बौद्धिक दृष्ट्या पंगू करून सोडते.
आपण प्रत्येक गोष्टीवर स्वतः विचार केला पाहिजे. इतरांचं लिखाण वाचलं पाहिजे, इतरांचे विचार ऐकले पाहिजेत, पण त्यावर स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. ज्या वेळी आपण वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त करू तेव्हा माणूस विवेक बुद्धीने काम करेल. आणि म्हणूनच संपूर्ण स्वातंत्र्य हेच आपले व्यक्तिगत स्वरूपाचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. अनुयायित्व नाकारून व्यक्तिगत स्वातंत्र्याचा लख्ख उजेड सर्वत्र पसरायला हवा.
माणूस म्हणून आपला विकास होण्यासाठी या स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे...

8 comments:

  1. I think there are two sides of the coin. What you are describing is more of "blind following".
    But there are lot of reason why do you want to follow some one.
    1. Avoid chaos
    In big comapnies for example, you have to follow what your manager says. If you dont like it, you join another company (there is freedom there), but as long as you are with the company you must follow the processes. This required, else it will be chaos. (Another example, what will happen if there are 11 captains on the field in cricket game)

    2. Not every one is brilliant. Hence there is more wisdom in following some one who is more wise than you are. If you believe, following a person can make world better place, then why not.

    Again, you want to be sane, and make sure you are not blind following some one.

    Again this has nothing to do with "freedom". As long as you can opt out from "following" some one how that can be called "salevery"is not clear.

    ReplyDelete
  2. Are you talking a bout anarchy here??
    Liked the article,as u said the main flaw is lack of thinking process.
    @Ameya: Its not about brilliance its about knowing what works for you with all its flaws and repercussions.

    ReplyDelete
  3. @ अमेय
    आपण तुझ्या मुद्द्यांचा एकेक करून विचार करू.
    १) एखादी कंपनी चालवणं किंवा क्रिकेट खेळणं याबद्दल आपलं बोलणं चालू नाहीये. आपलं साधारण वैचारिक प्रक्रिया यावर बोलणं चालू आहे. जे तू म्हणतोयस त्याला टीम वर्क म्हणतात. अनुयायित्व नव्हे. (सचिन तेंडूलकरला धोनीचा अनुयायी म्हणशील की सहकारी??!!)
    २) ब्रिलीयंस चा प्रश्नच उद्भवत नाही. विकास किंवा सुधारणेच्या कल्पना एखाद्याच्या दृष्टीने वेगळ्या असतील दुसऱ्याच्या अगदी विरुद्ध असतील. एक म्हणेल 'मला एसी मध्ये बसणं म्हणजे प्रगती वाटते' दुसरा म्हणेल 'मला नाही तसं वाटत.' एक म्हणेल 'रोज दारू प्यायली पाहिजे त्यामुळे आयुष्य सुखद होतं.' दुसरा म्हणेल 'नाही असं मला नाही वाटत.' प्रत्येकाने आपापल्या विकासाची आपल्या परीने व्याख्या करावी. आणि त्यासाठी जगाच्या ज्ञानाचा आधार घ्यावाच. पण दारू पिणे चांगले का वाईट याचा ज्याचा त्याने आपापल्या परीने विचार करावा आणि ठरवावे. केवळ गांधी सांगतात की दारू पिऊ नका म्हणून मी दारू पीत नाही किंवा विजय मल्ल्या सांगतो की दारू प्या म्हणून मी दारू पितो याला मी वैचारिक अपंगत्व म्हणतो. सारासार विचारबुद्धी प्रत्येकात असते. त्यासाठी स्वतंत्र ब्रिलीयंस लागत नाही. जगातले अत्यंत हुशार आणि खरोखर ब्रिलीयंट लोक आपले सगळे विचार गहाण टाकून अनुयायी झालेले आपण पाहतो. गांधींच्या भोवतीचे सगळे कॉंग्रेस नेते, संघाच्या वर्तुळात असणारे लोक अशी कितीतरी उदाहरणे आहेत. ओसामाचे अनुयायी ब्रिलीयंट नसतात असं वाटतं की काय तुला??
    ३) स्वतःहून स्वीकारलेली गुलामगिरी, गुलामगिरी नाही असे तू कसे काय म्हणतोस मला कळत नाही. जेव्हा मी गुलामगिरी स्वीकारली तेव्हा मी स्वतंत्रच असतो यात काही वादच नाही. पण तेच स्वातंत्र्य घालवतो. समजा आज आपण ब्रिटिशांना म्हणलं की, 'प्लीज इथे या आणि आमच्यावर राज्य करा आणि आम्हाला राज्य करण्याच्या जबाबदारीतून मुक्त करा', तर?? आता इथे 'राज्य करण्याच्या' जागी 'विचार करणं' टाकून बघ. आणि 'ब्रिटीशांच्या' जागी 'विचारसरणी' टाकून बघ. मला नेमकं काय म्हणायचं आहे ते तुला कळेल.

    @ अमृता
    anarchy म्हणजे अराजक किंवा बेबंदशाही. तसं काहीच मला म्हणायचं नाहीये. राज्यव्यवस्था किंवा शासनयंत्रणा याबद्दल मी बोलत नाहीये. मी 'सामाजिक व्यवस्थेबद्दल' बोलतो आहे. सामाजिक स्वास्थ्याबद्दल बोलतो आहे. म्हणून मी तुकारामांचं उदाहरण दिलं.

    ReplyDelete
  4. Hey ! Khoop masta lekha...but...
    i think " manasik gulamgiri" ani "anuyayitva" yaat ek motha pharak ahe...
    "anuyayittva" he apan char choughanna pahun , kivva swathachya dokyane swatha sweekarto, baryachda dolaspane sweekarun nantar andhale hoto.
    " manasik gulamgiri" matra aplyawar nakalat ladli geleli aste, pidhyanpidhya ticha varsa, aplyakade atyanta agantukpane chalat yeto, agadi subconscious mind var ya gulamgirichi impressions kadhi padatat? ka ti raktatunach yetat? he shodhna khup mahattvacha ahe

    So basically, " anuyayittva" nakarna he tyamanane soppa ahe.. pan mulat apan " gulamigirit" ahot he kalaylach lokanchi ayushyachya ayushya nighun jatat!

    ReplyDelete
  5. @ पूर्वी,
    अगदी बरोबर आहे तुझं .... अनुयायित्व आणि वैचारिक गुलामगिरी यामध्ये भरपूर फरक आहे. अनुयायित्व हा गुलामगिरीकडे नेणारा रस्ता आहे. पण गुलामगिरी जन्मतःच लादली गेलेली असो किंवा नंतर कोणाचेतरी अनुयायी झाल्यावर आपणच स्वखुशीने स्वीकारलेली असो, गुलामगिरीच्या स्वरुपात त्याने काहीच फरक पडत नाही. अनुयायित्व आणि आंधळे अनुयायित्व असा फरक करताच येत नाही. कारण अनुयायीत्वच मुळात आंधळे असते.

    ReplyDelete
  6. Tanmay I will lend you a book called better India better world ny narayan murthy.. And as you say anuyayita..I somne what agree to his ideas.." He said almost since last 500 years I would say.India is ruled by foreigners,So through generatons we are salves..our pysches have changed dramatically,for us governance is to be taken care by an oustider its not my job, We value our family than our society ,we dont think society is our family, we keep our own houses clean but we dont even bother to throw the same garbage aon road.."
    this is just a simple example..
    So for me we will truly achieve freedom when all the people we take ownership of their own country and for that.. we should start from freedom of thought ,freedom of rational and bottom line freedom of deciding what is right and following it till the peril..We have forgotten how to dream so there is no question of following them so thats why better follow orders..
    But still as an optimist i believe feeling of real freedom is higly contageious..anuyayita will take its course..and will do the job of making people think.. its just the first step that we need to take..!!!

    ReplyDelete
  7. "Morpheus: That you are a slave, Neo. Like everyone else you were born into bondage, born into a prison that you cannot smell or taste or touch. A prison for your mind.... Unfortunately, no one can be told what the Matrix is. You have to see it for yourself. This is your last chance. After this there is no turning back. You take the blue pill, the story ends, you wake up in your bed and believe whatever you want to believe. You take the red pill, you stay in Wonderland, and I show you how deep the rabbit hole goes.... Remember, all I'm offering is the truth, nothing more.... Follow me.... Apoc, are we online?"
    "Morpheus: Have you ever had a dream, Neo, that you were so sure was real. What if you were unable to wake from that dream. How would you know the difference between the dream world and the real world?"

    Dialogue from the Movie The Matrix...

    ReplyDelete